तारकर्ली ते मालवण समुद्रात MTDC कडून पडताळणी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 22, 2023 20:22 PM
views 291  views

मालवण : तारकर्ली ते मालवण समुद्रात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जल पर्यटन विभागाकडून अत्याधुनिक रेस्क्यु बोटींच्या साहाय्याने सागरी सुरक्षिततेची पडताळणी करण्यात आली. त्याच प्रमाणे तारकर्ली समुद्रात आपत्कालीन घटनेस सामोरे जाण्यासाठी बचाव आणि हाताळणीची प्रात्यक्षिके घेण्यात आली. नौदल दिन कार्यक्रमाच्या दरम्यान सागरी सुरक्षिततेचा एक भाग म्हणून एमटीडीसीची ही टीम समुद्रात तैनात असणार आहे. 

सागरी संशोधक सारंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सायंकाळी तारकर्ली समुद्रात आपत्कानील परिस्थितीत बचाव आणि हाताळणीचे प्रात्यक्षिक पार पडले. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे कॅप्टन श्री भुजबळ, इसदाचे व्यवस्थापक सूरज भोसले, नाशिक बोट क्लब चे व्यवस्थापक धीरज चोपडेकर, गणपतीपुळे बोट क्लबचे व्यवस्थापक विवान राणे यांसह अन्य सहकारी उपस्थित होते. 


नौदल दिनाच्या कालावधीत समुद्री कोणी बुडत असल्यास, अथवा कोणत्याही समुद्रातील आपत्ती वेळी जीव वाचविण्याची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि साधनांचा वापर करण्यात आला होता.