सौ.हि.भा.वरसकर विद्यामंदिर व वराड कला वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

चैताली कैलास लाड 84.83 % मिळवून प्रथम
Edited by: देवयानी वरसकर
Published on: May 25, 2023 16:09 PM
views 205  views

     वराड ग्रामस्थ संघ,मुंबई संचालित,  सौ.हि.भा.वरसकर विद्यामंदिर व वराड कला वाणिज्य(सं) कनिष्ठ महाविद्यालयातून मार्च 23 च्या बारावी परीक्षेसाठी विद्यालयातून 14 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होवून ज्युनिअर कॉलेज चा निकाल 100% लागला. 

चैताली कैलास लाड 600 पैकी 509 गुण  84.83 % मिळवून प्रथम,ओंकार यशवंत परब 600 पैकी 471 गुण  78.50% मिळवून द्वितीय तर धनश्री हनुमंत सरमळकर 600 पैकी 448 गुण 74.67 % तृतीय आली आहे.

     सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे अभिनंदन वराड ग्रामस्थ संघ मुंबईचे अध्यक्ष अरुण गावडे व संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शालेय समिती चेअरमन आप्पासाहेब परुळेकर व सर्व सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती ,शाळा व्यवस्थापन व विकास समिती, मुख्याध्यापक सौ. प्रिया मयेकर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.