
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये स्थापन झालेल्या व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता पुढचं पाऊल म्हणून MPSC 2024 ची जय्यत तयारी करण्याच्यादृष्टीने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण-तरुणी उच्चस्तरीय अधिकारी व्हावेत यासाठी एमपीएससी परीक्षेसाठी क्लासेस सुरू करण्यात येत आहेत. तसेच खास स्कॉलरशिप परीक्षाही घेतली जाणार आहे. या माध्यमातून एमपीएससीची पूर्ण तयारी आताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातच करून घेतली जाणार आहे. दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत क्लासेसची खास सुविधा ठेवण्यात आली आहे. त्यासाठी 25 डिसेंबर संध्याकाळी 6 पर्यंत https://forms.gle/S44XqXbCubhnmgEr9 या वेबसाइटवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण-तरुणीनी आपली नावे नोंदवावित असे आवाहन कंपनीच्या वतीनं करण्यात आलंय.
कोकणवासीयांच्या प्रेमाखातर कोकणातील तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबविले आहेत. आज व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडमुळे अनेक गरजू तरुण-तरुणींना कोकणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. 12 फेब्रुवारी 2018 मध्ये सर्वप्रथम कोकणातील या उपक्रमाची सुरुवात झाली. आपल्या कोकणवासियांसाठी काहीतरी करावं या उद्देशानेच मुंबईसारख्या मायानगरीतून सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण भागात नेटवर्क उभ करण्याचा मानस कंपनीने तयार केला. कोकणात अनेक तरुण बेरोजगार आहेत. अनेक तरुणांना नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे गाठावं लागतंय आणि त्यासाठीच कोकणात डिजिटल तंत्रज्ञान उभं करण्याचा मनोदय व्यक्त केला.
२00 हुन अधिक तरुणांचं भविष्य झालं उज्वल
व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० हुन अधिक तरुण तरुणींना रोजगार देऊन आपलं हे स्वप्न सत्यात साकारला आहे. व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड ही भारतीय डिजिटल तंत्रज्ञानातील एक नावाजलेली कंपनी आहे. सावंतवाडीमधील जिमखाना मैदाना शेजारील भव्य इमारतीमध्ये व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड या कंपनीचे ऑफिस आहे.