खासदारांनी घेतला रत्नागिरीतील पावसाळी तयारीचा आढावा

Edited by:
Published on: May 31, 2025 19:18 PM
views 208  views

रत्नागिरी : खासदार नारायण राणे यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींना प्रतिबंध करण्यासाठी व प्रशासनाची तयारी तपासण्यासाठीरत्नागिरी जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली. रत्नागिरी जिल्ह्याची आढावा बैठक  जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत पूरस्थिती, दरड कोसळण्याचे संभाव्य धोके, आपत्कालीन मदत कार्य, आरोग्य व्यवस्था, नागरिकांचे पुनर्वसन, सुरक्षित निवाऱ्यांची उपलब्धता तसेच प्रशासनाची समन्वयात्मक तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.


आपत्तीपूर्व सज्जता, प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद, नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता – सर्वोच्च प्राधान्य याबद्दल चर्चा झाली. संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ राबविण्याचे निर्देश देण्यात आले.