पोलिसांचं संचलन..!

Edited by: विनायक गावस
Published on: March 17, 2024 07:28 AM
views 300  views

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काल सायंकाळी सावंतवाडी शहरात पोलिसांनी संचलन केलं. या पोलीस संचलनात ९ पोलीस अधिकारी, ७० कर्मचारी सहभागी झाले होते. जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान ते गांधी चौक अशा मुख्य परिसरातून हे संचलन करण्यात आल. सावंतवाडी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली या संचलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांसह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.