देवगड शहरात राज्य राखीव पोलीस दलाचे संचलन..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 28, 2024 10:18 AM
views 97  views

देवगड : आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ७ मे २०२४ रोजी जनतेने निर्भयपणे मतदान करावे, या उद्देशाने देवगड येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या बटालीयनने संचलन केले.देवगड एसटी स्टॅण्ड ते जामसंडे या मार्गावर रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये पोलीस निरीक्षक श्री सोनटक्के समवेत ३ पोलीस अधिकारी, ८० भारत राखीव बटालियनचे ८० जवान, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर यांचा समावेश होता.