देवगड-जामसंडेत पोलिसांचे संचलन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 19, 2024 09:55 AM
views 267  views

देवगड : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालीय. याच पार्श्वभूमीवर देवगड पोलीस ठाण्याच्यावतीने सोमवारी देवगड जामसंडे शहरात संचलन करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड जमसंडे शहरात संचलन सोमवारी सकाळी करण्यात आलं. यामध्ये तीन पोलीस अधिकारी, ४३ पोलीस अंमलदार उपस्थित होते.