शिक्षकांच्या मागणीसाठी आंदोलन...!

Edited by:
Published on: August 28, 2024 08:28 AM
views 81  views

दोडामार्ग : दोडामार्ग सावंतवाडा येथील प्राथमिक शाळेत शिक्षक द्या अशी वारवार मागणी करून देखील शिक्षण विभागागाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज बुधवारी शाळा व्यवस्तापन समितीने मुलांसहीत आंदोलनास सुरवात केली आहे. आणि जो पर्यंत कायम स्वरूपी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आमच आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शाळा व्यवस्तापन समितीने यावेळी सांगितले आहे.

सावंतवाडा येथील प्राथमिक शाळेत मुलांची 59 पट संख्या आहे दोन शिक्षक होते त्यातील एक शिक्षक रजेवर आहे. मग एका शिक्षकाला सर्व मुलांना शुकविणे शक्य होत नाही. त्यामुळे येथील शाळा व्यवस्तापन समिती व पालकांनी या शाळेत अजून एक शिक्षक द्या अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. दोडामार्ग गटशिक्षण विभागाला ही याची कल्पना दिली. मात्र या विषयाकडे शिक्षण विभागाने  दुर्लक्ष केला. दोन दिवसांपूर्वी कमिटीने दोडामार्ग शिक्षण विभागाची पुन्हा भेट घेतली येत्या दोन दिवसात म्हणजे बुधवारी सकाळी 10 वाजे पर्यंत  शिक्षक द्या अन्यथा 10.30 वाजता मुलांना घेऊन आंदोलनास बसणार असा इशारा यावेळी शाळा व्यवस्तापन समितीने गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र गटशिक्षण अधिकाऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. याच पश्वभूमीवर शाळा व्यवस्तापन समितीने मुलांना घेऊन शाळे बाहेर आंदोलनास सुरवात केली आहे. व जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तो पर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे असे सांगितले. यावेळी शाळा व्यवस्तापन समिती अध्यक्ष किरण काळबेकर, सदस्य सोमनाथ नाईक, रामदास नाईक, सिद्धेश बोडेकर, पल्लवी खांबल, मनीषा रेडकर, अनिशा देसाई, शुभदा शेटकर, उत्कर्षा गवस, अनिता परब, भारती बर्वे, विभा शिरोडकर, गायत्री मांगले, संजना जाधव, अमर वेटे, स्नेहा देसाई, मनीषा काकाटकर आदी ग्रामस्थ उपस्तित होते.

शिक्षणमंत्री दीपक केसरकरांच खोटं आश्वासन

दरम्यान आंदोलनास बसलेल्या शाळा व्यवस्तापन समितिचे अध्यक्ष म्हणाले की दोडामार्ग नगरपंचायत मच्छी मार्केट चे लोकार्पण करण्यास आलेल्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कमिटीने निवेदन दिले होते. त्यांना सर्व विषयही सविस्तर सांगण्यात आला होता. त्यावेळी मंत्री केसरकर म्हणाले की नवीन शिक्षक भरती झालेली आहे त्यामुळे तुम्हाला तात्काळ एक शिक्षक देतो अस आश्वासन यावेळी त्यांनी दिल होत. मात्र त्यांनी दिलेलं आश्वासन हे हवेतच विरघळल वाट त्यांनी आम्हाला खोटं आश्वासन दिल असे शाळा व्यवस्तापन समितीने म्हटलं आहे.