मोती तलावाच्या काठावर होणार आतषबाजी !

विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य
Edited by: भरत केसरकर
Published on: October 14, 2023 11:07 AM
views 195  views

सावंतवाडी : भाजपा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आज रात्री दहा वाजता मोती तलावाच्या काठावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. एका वेगळ्या यंत्रणेद्वारे आगळीवेगळी ही आतषबाजी असणार आहे.

ही आतषबाजी एलईडी स्क्रीनव्दारे गार्डन परिसरात शहरातील नागरिकांना पाहता येणार आहे. त्याठिकाणी तेथे बसण्यासाठी खास खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी प्रथमच आगळीवेगळी ही आतषबाजी पाहण्यासाठी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी व विशाल परब मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे.