
सावंतवाडी : गुरूवारी सकाळी मोती तलावात एक अनोळखी मृतदेह तरंगताना निदर्शनास आला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलं आहे. नगरपरिषद समोरील भागात हा मृतदेह आढळून आला. न.प.कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
आंबेडकर नगर येथील राजेश चद्रकांत पाटकर (वय ५५ वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव असून घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले, पोलीस हवालदार मनोज राऊत, सुनील नाईक, हनुमंत धोत्रे आदी उपस्थित होते.