
सावंतवाडी : मोती तलावाच्या संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात होणार आहे. दिनांक 26 डिसेंबरच्या आत या कामाला सुरुवात करू असे फोनवरून संपर्क साधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना सांगितले आहे. बांधकाम लवकर सुरू होण्यासाठी साळगावकर यांच्या सहकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती उद्यापासून सह्यांची मोहीमही मोती तलावापाशी राबवण्याचे घोषित केलं होतं परंतु आजच संपर्क साधून बांधकाम अधिकारी चव्हाण यांनी आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे 22 डिसेंबरला वर्क ऑर्डर देणार आहे तसेच ठेकेदारांनी तात्काळ काम सुरू करण्याचे मान्य केल्याचे फोनवरून सांगितले आहे. ही माहिती माझे सहकारी माजी नगरसेवक सुरेश भोगटे माजी नगरसेवक विलास जाधव सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव नगरसेविका अफरोज राजगुरू राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर उपाध्यक्ष बंड्या तोडफेकर उपाध्यक्ष दिलीप पवार छ* संघटनेचे अध्यक्ष संतोष तळवणेकर कल्याण कदम यांच्याशी चर्चा करून तूर्तास पुढील आंदोलन स्थगित करत आहोत, असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.