
सिंधूदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील एका कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षीय युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. भाग्यश्री अनिल तांबे असे तिचे नाव असून तिच्या पश्चात फक्त तिची आई आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या बेडरूमचा दरवाजा तोडून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ओरोस पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पोलीस उप निरीक्षक कोल्हटकर अधिक तपास करीत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या तांबे यांची ती एकुलती एक मुलगी होती. समाज कल्याण विभागात कार्यरत असलेले अनिल तांबे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी अनुकंपा खाली लागल्या होत्या.
बीएससी कॉम्प्युटर कॉम्प्युटर शिकलेली भाग्यश्री ही यूपीएससीचा अभ्यास करीत होती. रविवारी रात्री तिने जेवण करून आपल्या बेडरूम मध्ये झोपण्यास गेली होती. मात्र रात्रीच तिने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी बेडरूम उघडत नसल्याने पोलिसांना कळविण्यात आले. व दरवाजा तोडून तिचा मृत्यू द्या बाहेर काढण्यात आला. याबाबत अधिक तपास ओरोस पोलीस करीत आहेत.