
सावंतवाडी : संस्कृत भाषेचा प्रचार- प्रसार करणारी संस्था संस्कृत भारती गोवाद्वारे आयोजित विविध परीक्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेने उत्तुंग यश संपादित केले.
देववाणी प्रवेश: या परीक्षेत एकूण 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत साईल वाडकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर वैष्णवी बोडके हिने द्वितीय क्रमांक संपादित केला तसेच लावण्या केसरकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
देववाणी परिचय: या परीक्षेत एकूण आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मृण्मय शिरोडकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर समृद्धी मडगावकर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला तसेच समीक्षा केसरकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. देववाणी प्रबोध: या परीक्षेत एकूण तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये सृष्टी शिरसाट हिने प्रथम क्रमांक पटकावला. नेहल मठकर हिने द्वितीय क्रमांक संपादित केला तर ईशान गावकर याने तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका श्रुती जोशी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले,विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. श्री. शामराव सावंत, मंडळाचे पदसिद्ध सदस्य जयप्रकाश सावंत ,डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.