मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयातील शवगृह बंद

संदेश पारकर यांनी वेधलं संबंधितांचं लक्ष
Edited by:
Published on: July 11, 2024 11:51 AM
views 311  views

सिंधुदुर्ग : सिंधुदूर्ग मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयातील शवगृह हे गेले १२ दिवस उलटून देखिल बंद अवस्थेत आहे. हे शवगृह  बंदस्थितीत असल्याने जिल्ह्यातील मृतांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत. या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयांला भेट देऊन शवगृहाची पाहणी केली. त्यावेळी शवगृह नादुरुस्त अवस्थेत असल्याची खात्री त्यांनी केली.  

ओरोस येथील शवगृह बंद असल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटिल यांची संदेश पारकर यांनी भेट घेवून विचारणा केली. शवगृहाचा कॉम्प्रेसर नादुरुस्त झाला असल्याने शवगृह बंद असल्याची कबुली डॉ. पाटील यांनी दिली. दरम्यान,  मेडिकलचे डीन डॉ. जोशी यांच्याशी संदेश पारकर यांनी फोनव्दारे संपर्क साधून चर्चा केली.  डॉ. जोशी यांनी खराब झालेल्या शवगृहाचा कॉम्प्रेसर खराब असून २ दिवसांत शवगृह पूर्वस्थितीत करणार असल्याचे आश्वासन डॉ .जोशी यांनी पारकर यांना दिले. यावेळी उपअधीक्षक डॉक्टर नागरगोजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा निमंत्रक, छोटू पारकर, अवधूत मालनकर आदी उपस्थीत होते.