निगुडेतील मोरीच्या कामाला 8 दिवसात होणार सुरुवात

उपअभियंत्यांच्या सूचना
Edited by: विनायक गांवस
Published on: April 24, 2025 19:36 PM
views 218  views

सावंतवाडी : निगुडे नवीन देऊळवाडी येथील मोरी बांधून अनेक वर्ष झाली. हे काम खूप जुने असून त्या ठिकाणी पाईप व मोरीला दरवर्षी भगदाड पडायचे. यासंदर्भात माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी उपअभियंता यांना पाहणी करण्यासाठी सांगितले होते. त्याचीच दखल घेऊन आज उपअभियंता अंगद शेळके यांनी मोरीची पाहणी केली. 

यावेळी त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारवी अशा सूचना उपअभियंत्यांनी शाखा अभियंता यांना दिले आहेत. मोरी ही दरवर्षी  ग्रामस्थ, मेहनत करून डागडुजी करायचे. तत्कालीन शाखा अभियंता श्री. शिंदे यांनी या मोरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. परंतु निधी कमी असल्यामुळे ते काम थांबले होते. आता हे काम रस्ते विशेष दुरुस्ती अंतर्गत मंजूर असून त्या ठिकाणी पक्की मोरी व साईडला संरक्षक भिंत असणार असून येत्या आठ दिवसात काम सुरू करण्याचा सूचना ठेकेदाराला दिलेल्या आहेत असे उपअभियंता श्री. शेळके यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे निगुडे गावठणवाडी उर्वरित रस्त्यावर संदर्भातील चर्चा करण्यात आली. यावेळी निगुडे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, उपअभियंता अंगद शेळके, शाखा अभियंता श्री. टेमकर, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे उपस्थित होते.