मोरगांव जि. प. शाळेत विद्यार्थ्याना भाजपकडून मोफत वाह्यावाटप...!

Edited by: संदीप देसाई
Published on: July 04, 2023 13:58 PM
views 119  views

दोडामार्ग : मोरगाव जि.प.पूर्ण प्राथमिक नंबर १ येथे जिल्हा भाजपच्या वतीने पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामाध्यमातून मोफत वह्या वाटप कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला. 

यावेळी शाळेतील 50 विद्यार्थ्याना मोफत वाह्यावाटप करण्यातआले.  यावेळी भाजप जिल्हा उपाअध्यक्ष एकनाथ नाडकर्णी,  तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, सरपंच संतोष आईर,  श्री.कोरगावकर ग्रामपंचायत सदस्य श्री. गावडे यांच्या उपस्थितीत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सदर कार्यक्रमात एकुण ५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या शिक्षक श्रीम.कुबल, श्रीम. पाटील, सावंत सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मणिपाल राऊळ यांनी केले. आभार  सरपंच संतोष आईर यांनी मानले.