
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. खरे म्हणजे यावेळी मान्सून सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकर दाखल होईल असा अंदाज आहे.
मान्सून केरळमध्ये २७ मे रोजी दाखल होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा मान्सून २ जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र त्या पूर्वी जिल्ह्यात मंगळवारी मान्सून पूर्व पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे.