शिरगाव इथं वनविभागाकडून माकड पकडण्याची मोहीम

Edited by:
Published on: January 03, 2025 19:39 PM
views 204  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथे वनविभागामार्फत माकड पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.माकडांचा वनविभागामार्फत बंदोबस्त करण्यासाठी येथे माकड पकडण्याची गुरुवारी मोहीम राबविण्यात आली होती. देवगड तालुक्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी यावेळी दिली आहे.

शेतीचे व शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.या मोहिमेचे कितपत यश येते ते पाहून त्यात अधिकची सुधारणा करून संपूर्ण देवगड तालुक्यात ही मोहीम अजून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.वनविभागाने पहिल्या दिवसभरात पकडलेली १८ माकडे अभयारण्यातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहेत.शेतकऱ्यानी पुन्हा शेतीकडे वळावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती यावेळी संदीप साटम यांनी दिली.

यावेळी भाजप देवगड तालुकाध्यक्ष राजेंद्र शेटये,माजी ग्रामपंचायत सदस्य, राजेश कदम, युधिराज राणे, संदीप चव्हाण, प्रथमेश तावडे, शैलेंद्र जाधव, सूर्यकांत तावडे, देवगड वनपाल श्रीकृष्ण परीट, मिठबांव वनरक्षक आप्पासो राठोड, जलद बचाव कृती दलाचे टीम प्रमुख अनिल गावडे, वैभव अमृसकर, दिवाकर बांबर्डेकर,प्रसाद गावडे उपस्थित होते.

माकडापासून शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याबाबत वनविभाग सावंतवाडीचे उपवन संरक्षक यांचे संदीप साटम यांनी लक्ष वेधले होते.त्या अनुषंगाने २ जानेवारीला शिरगाव गावठाण येथे वनविभागाचे जलद बचाव कृती पथक दाखल झाले.

काही शेतकऱ्यांनी तर माकडांच्या त्रासाला कंटाळून शेती करणे देखील सोडले शिरगावात नारळ, केळी, आआंबा, काजू,पपई तसेच भुईमूग,चवळी, कुळीथ या पिकांचे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. घरांच्या छपरावरील सिमेंट्चे पत्रे कौले यांच्यावर उड्या मारून फोडून टाकण्यासारखे प्रकार पारंवार घडत आहेत तसेच घराची दारे-खिडक्या उघड्या राहिल्यास घरातील खाद्यपदार्थ पळावण्यापर्यंत माकडांची मजल गेलेली आहे. शेतकयांनी काही ठिकाणी माकडांपासून होणाऱ्या नुकसानाला कंटाळून शेतीच करणे सोडून दिले आहे.

येथे लोखंडी पिंजऱ्याच्या साहाय्याने माकड पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. शिरगाव गावठाण येथे उपवनसंरक्षक नवकिशोर रेडी, सहायक वन संरक्षक सुनील लाड, वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम राबविण्यात आली होती.