
सावंतवाडी : सावरवाड येथील रहिवासी मोहन रामचंद्र मडगावकर (७०) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत मडगावकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुपारी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोहन मडगांवकर यांचा सुरुवातीला मुंबईत सुवर्ण कारागीर म्हणून काम करायचे. त्यानंतर आपल्या सावरवाड गावातही त्यांनी हा व्यवसाय केला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन भाऊ, बहिण, भावजय, पुतणे, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सुनिल मडगावकर आणि विद्याधर मडगावकर यांचे भाऊ तर मडूरे सरपंच उदय चिंदरकर यांचे ते भावोजी होत. तसेच माजी सभापती तथा जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर यांचे ते निकटचे सहकारी होते.