चाकरमान्यांना घेऊन मोदी एक्सप्रेस कोकणात रवाना!

Edited by:
Published on: August 23, 2025 18:45 PM
views 188  views

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना आपल्या गावी जाता यावे यासाठी दरवर्षीप्रमाणे कोकणवासीयांच्या हक्काची मोदी एक्सप्रेस सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे कोकणवासीयांच्या सेवेसाठी यंदा दोन एक्सप्रेस धावणार असून यातील एक एक्सप्रेस आज दि.२३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दादर येथून कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी चव्हाण यांच्या समवेत आज मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व कोकणवासीय नागरिक उपस्थित होते.

मोदी एक्सप्रेसमधून गावी निघालेल्या सर्व गणेशभक्तांना खूप खूप शुभेच्छा!

आपला प्रवास सुखाचा होवो!