
दोडामार्ग : देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक तिलारी येथे घेण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रील) घेण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा यात समावेश होता. या १६ ठिकाणांमध्ये सिधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश असल्याने आज संपूर्ण जिल्ह्यात दुपारी ४ वाजता मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी तिलारी येथे मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. दुपारी ४ वाजता आवाज वरखाली होणारा भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क करण्यात आले. यावेळी पोलिस, नगरपालिका प्रशासन यांच्यामार्फत स आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रूग्णवाहिका सज्ज केल्या होत्या. नागरिकांनीही या मॉक ड्रिलला प्रतिसाद दिला.
तिलारी धरण परिसरात रंगीत तालीम बुधवारी ०७ मे रोजी दुपारी ४,०० वाजता नागरी संरक्षण दल यांचेमार्फत देशभरात नागरी संरक्षणाच्या अनुषंगाने घेण्यात आली सदर रंगीत तालीम तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या धरण परिसरात घेण्यात आली.
या रंगीत तालीमच्या अनुषंगाने दिलेले निर्देशानुसार दुपारी ०४.०० ते ४.०२ ह्या वेळेत प्रथम सायरन वाजविला या सायरन चा आवाज कमी-जास्त-कमी प्रमाणात होता दु. ०४.१५ वाजता दूसरा सायरन वाजविण्यात येईल या सायरनचा आवाज सलग असेल. या सायरनच्या आवाजानंतर संबंधित प्रशासकीय यंत्रणा, स्वयंसेवक नागरिकांच्या मदतीसाठी येतील. अशाप्रकारे या रंगीत तालीमचे स्वरूप होते.
दोडामार्ग तालुक्यातील अधिकारी - कर्मचारी यांना रंगीत तालीमीची माहिती देण्यात आली. तसेच दुपारी ४.१५ वाजता दुसरा सायरन वाजल्यावर रंगीत तालीम समाप्त झाली. यावेळी दोडामार्ग तहसीलदार कसेकर पोलिस निरीक्षक खोपडे कार्यकारी अभियंता विनायक जाधव उपअभियंता म्हेत्रे, मंडळ अधिकारी राजन गवस, शरद शिरसाठ तलाठी स्मिता परब, श्रीम.शेख नेहरू युवा केंद्राचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.