झुंडशाही खपवून घेणार नाही : वैभव नाईक

Edited by: भरत केसरकर
Published on: December 30, 2023 16:17 PM
views 165  views

कुडाळ : विकसित भारत संकल्प यात्रेच्या दरम्यान काल कुडाळमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची व धक्काबुक्की झाली होती. मोदी सरकारच्या नावाला विरोध करत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी हा कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी महाविकास आघाडीच्या उपनगराध्यक्षासह पाच नगरसेवक व इतर दहा ते बारा कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, हे गुन्हे भाजपच्या नेत्यांनी आणलेल्या दबावातून दाखल केले असून ही झुंडशाही आम्ही खपवून घेणार नसल्याचे ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. आज त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काल झालेल्या राड्यावेळी कुडाळ शहराबाहेरून आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तसेच माजी खासदार निलेश राणेंचे नाव न घेता तुमची झुंड शाही आम्ही दहा वर्षांपूर्वीच मोडून काढली असल्याचा टोला लगावला. तर मोदी रथाच्या मागून आता आम्ही होऊ दे चर्चेच्या माध्यमातून फिरणार आणि जनतेला यांची फसवेगिरी लक्षात आणून देणार असल्याचा वैभव नाईक यांनी सांगितले.