मनसेच्या सावंतवाडी विधानसभा सचिव पदी गुरुदास गवंडे...!

Edited by: भगवान शेलटे
Published on: November 25, 2023 18:03 PM
views 102  views

सावंतवाडी : पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यरत असणारे गुरुदास गवंडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सावंतवाडी विधानसभा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. तसे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी कधीही तत्पर असणार व्यक्तिमत्व अशी गवंडे यांची ख्याती आहे. त्यांच्या या निवडीनंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

गुरुदास गवंडे यांनी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदाचा कार्यभार सन २०१४ ते सन २०२२ पर्यंत  त्यांच्याकडे होता पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाची ध्येयधोरणे त्यांनी अमलात आणली त्यानंतर निगुडे सारख्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून उपसरपंच पद पाच वर्ष सांभाळले याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सावंतवाडी विधानसभा सचिव पदी पक्षाने त्यांची नेमणूक केली.