मनसेची डास प्रतिबंधात्मक फवारणीची मागणी...!

Edited by:
Published on: June 20, 2024 12:10 PM
views 108  views

सावंतवाडी : पावसळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा फैलाव झाला आहे.त्याचसोबतच रोगराई वाढत असल्याचे संकेत देखील पाहायला मिळत आहेत.त्यामुळे  प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ शहरात डास प्रतिबंधात्मक फवारणी करुन उघडी गटारे बंद करावीत अशी मागणी मनसेच्या माध्यमातून आरोग्य अधिकारी रसिका नाडकर्णी यांच्याकडे करण्यात आली.

दरम्यान, यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार असून डास प्रतिबंघात्मक फवारणी संपूर्ण शहरात प्रभागनिहाय हाती घेण्यात आली आहे.त्यामुळे आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरु असल्याचे सौ.नाडकर्णी यांनी सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर,उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ,तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत शहर उपाध्यक्ष सिद्धेश आकेरकर,मळगाव उपविभाग अध्यक्ष राकेश परब आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.