मनसे विद्यार्थी सेना जिल्हाद्यक्ष अनिकेत तर्फे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 08, 2024 12:12 PM
views 343  views

देवगड  : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी अनिकेत तर्फे यांची निवड करण्यात आली आहे. मनसे प्रमुख राज  ठाकरे यांच्या मनसे  विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य संघटक यश सरदेसाई, प्रशांत कनोजिया यांच्या मार्गदर्शनाने अनिकेत तर्फे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

अनिकेत तर्फे हे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही वर्षे सिंधुदुर्ग उपजिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना स्वतःच्या जोरावर अनेक कामे केली आहेत. मुंबई - गोवा मिडल कट बंद करून दाखविले, कणकवली तालुक्यातील इंग्लिश मिडीयम च्या शाळेवरील इंग्रजीत असलेलं बोर्ड मराठीत केली. कुर्ली गावातील नदीच्या दुरुस्तीचे काम, नांदगाव ATM मधे मराठी भाषा,अशी अनेक काम अनिकेत तर्फे यांनी केली . याच कामाला प्रेरित होऊन अनिकेत तर्फे यांच्यावरती जिल्हा अध्यक्षही जबाबदारी देण्यात आली आहे.आता अनिकेत तर्फे हि जबाबदारी कशी पार पाडतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.