स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढण्याची मनसैनिकांची भुमिका

मनसेचे राज्य सरचिटणीस संदीप दळवी यांची माहिती
Edited by: विनायक गांवस
Published on: October 14, 2025 16:03 PM
views 28  views

सावंतवाडी : आम्ही जिल्ह्याचा आढावा घेतला असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे तो पोहोचवणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढण्याची भुमिका मनसैनिकांची आहे. माजी आमदार, वैभव नाईक यांचीही भेट जिल्ह्यात झाली. मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची एकत्रित बैठक लावणार आहोत, अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस संदीप दळवी यांनी दिली‌.‌ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, राज्यातील काही आंदोलनप्रसंगी मनसे आणि सेना एकत्र आली. कोकणात देखील त्या पद्धतीने आमचा विचार सुरू आहे. तसेच मनसेतून लढण्याची इच्छा असेलल्यांनाही पक्षाची दार खूली आहेत. आम्ही ज्या जागा लढू त्या जिंकण्यासाठीच लढू असा विश्वास श्री. दळवी यांनी व्यक्त केला. काही भागात नवीन लोक प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मनसे कामगार संघटना राज्य सरचिटणीस गजानन राणे, जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, तालुकाध्यक्ष मिलींद सावंत, शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर, सुधीर राऊळ, चिन्मय नाडकर्णी, राकेश परब, काशीराम गावडे, सुनील सावंत, मनोज तिरोडकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.