मनसेच्या संतोष शिंगाडे यांच्यावतीने तोरसाळेला सोलारलाईट !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 07, 2023 14:10 PM
views 143  views

देवगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवगड विधानसभा संपर्कध्यक्ष संतोष शिंगाडे यांचा वाढदिवस विविध सामजिक उपक्रमांतून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त तोरसोळे जुवळेवाडी येथे सोलर लाईटचे लोकार्पण करण्यात आले.तसेच वाढदिवसा निमित्त देवगड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले. 

तोरसोळे प्राथमिक शाळा येथे खाऊ वाटप करण्यात आले. तसेच, असलदे येथील वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तोरसोळे जुवळे वाडी येथे सोलर लाईट लोकार्पण करण्यात आले.त्त्याच प्रमाणे वाढदिवसा निमित्त मुंबईसह त्यांच्या गावी देवगड येथे विविध सामजिक उपक्रम राबविण्यात आले. 

राजकीय क्षेत्रात वावरताना आपले सामाजिक भान जपणारे देवगड तालुक्यातील लोकांचे लाडके नेतृत्व संतोष शिंगाडे यांनी आपली सामाजिक बांधिलकी वाढदिवसाच्या दिवशी विविध सामाजिक उपक्रम राबउन दाखउन दिली आहे या वेळी राजन पवार,सचिन राणे,प्रदीप मिराशी,सोहम पवार,प्रशांत कदम, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.