
वैभववाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सचिव दीपक यशवंत पार्टे, वय ५२ यांचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. नाधवडे सरदारवाडी येथील घराशेजारील विहीरीत सकाळी त्यांचा मृतदेह सापडला आहे. हा प्रकार आज सकाळी ७च्या दरम्यान घडला आहे.
याबातची पोलीसांत खबर पुतण्या मोहीत पार्टे यांनी पोलीसांत दिली आहे. घटनास्थळी जाऊन पोलीसांनी पंचनामा केला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पार्टे यांच्या पश्चात्य पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.