महावितरण विरोधात मनसे आक्रमक...!

उपकार्यकारी अभियंता संदीप भुरे यांना विचारला जाब*
Edited by:
Published on: June 13, 2023 12:19 PM
views 121  views

सावंतवाडी  : पावसाळा सुरू होण्यापूर्वी वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.यासंदर्भात मनसेचे माजी पदाधिकारी यांनी सावंतवाडी महावितरण उपकार्यकारी अभियंता संदीप भुरे यांची भेट घेत पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांवरील झाडे तोडली न गेल्यामुळे अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे.पावसाळा नुकताच सुरू झाला असून दोन दिवसात जर विद्युत यंत्रणेची हालत अशी होत असेल तर इतर दिवशी काय करायचं.काही ठिकाणी विद्युत खांब जीर्ण झालेले आहेत. पावसाळ्यापूर्वी ते दुरुस्त करणे गरजेचे होते परंतु आपला महावितरण विभाग कुठेही लक्ष घालताना दिसत नाही. विजेची बिले मात्र नागरिकांना भरमसाठ प्रमाणात आकारली जातात. मळेवाड ,निगुडे, रोनापाल येथील विद्युत पुरवठा रोज सकाळी ०३ ते ०७ वाजेपर्यंत गेले तीन दिवस खंडित का केला जातो? तसेच आपल्याकडे कर्मचारी मळेवाड कोंडुरा ते दाभिल इत्यादी गावांमध्ये तीन विद्युत सेन्शन असून एक विद्युत लाईन कर्मचारी किती गाव सांभाळणार. त्यामुळे एका कर्मचाऱ्याकडे एवढा भार न देता कंत्राटी कर्मचारी नेमा दर सोमवारी सावंतवाडीत शहरातील भारनियमाखाली विद्युत पुरवठा खंडित केला जातो. तो तात्काळ बंद करा. जर आपल्याकडे पुरेसा विद्युत साठा नाही आहे तर मग क्रशर क्वारीसाठी जो विद्युत पुरवठा केला जातो तो बंद करा. यापुढे सर्वसामान्य नागरिकांना जर विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागले तर मनसे खपून घेणार नाही. दरवर्षी पावसाळा आला की तुमच्या या गोष्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो..यावर्षी पावसाळ्यात व गणेश चतुर्थी काळात  वीज पुरवठा सुरळीत राहावा. यादृष्टीने आपण आतापासूनच आपल्या कर्मचाऱ्यांना सांगून त्याचे योग्य नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना करावी. पावसाळ्यात वादळी, वारे जोराचा पाऊस यामुळे जर जीर्ण विद्युत खांबांचे नुकसान झाले. तर त्याला सर्वस्वी आपण जबाबदार राहणार. ज्या गावांमध्ये विजेचा पुरवठा कमी दाबाने होत आहे. त्या ठिकाणी आपण आपल्या स्तरावर अंदाजपत्रक सादर करून स्थानिक ग्रामपंचायतींना कळवा. यावेळी मनसेचे आरोस चे पदाधिकारी अमित नाईक यांनी आरोस- गावठाण  - खांबलेवाडी रात्रीपासून विद्युत पुरवठा झाड पडून खंडित आहे तो विद्युत पुरवठा सुरळीत करा. अशी  मागणी त्यांनी केली. यावेळी मनसेचे सावंतवाडी माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी इशारा दिला की यासंदर्भात योग्य ती दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपल्या कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा त्यांनी दिला. यावेळी मनसेचे अमित नाईक, गजानन डेगवेकर, प्रवीण गवस, बाळाराम मोरजकर आदी उपस्थित होते.