
सावंतवाडी : महिला दिनाचे औचित्य साधुन मनसेने सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, महाविद्यालय आणि पोलीस ठाणे येथे जाऊन महिलांना पुष्पगुष्छ देऊन महिलांचा सन्मान केला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी महिलांचा सन्मान करण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, पोलीस ठाणे आणि महाविद्यालयामध्ये जाऊन महिलांची भेट घेऊन त्याच्या आनंदात सहभागी होऊन सगळ्या महिलांचा सन्मान केला. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलींद सावंत, विद्यार्थीसेना उपजिल्हा अध्यक्ष साहील तळकटकर, उप तालुकाअध्यक्ष सुनिल असवेकर, बांदा शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, ओंकार नवार उपविभाग अध्यक्ष राकेश परब व विजय बांदेकर हे यावेळी उपस्थित होते.