मळगांवमध्ये मनसे आणि सुधीर राऊळ मित्रमंडळानं केलं मोठ्या जल्लोषात राज ठाकरे यांचं स्वागत !

राजसाहेबांना पाहून सर्व कार्यकर्ते झाले भावुक !
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 01, 2022 14:47 PM
views 326  views

सावंतवाडी : गगनभेदी घोषणा आणि युवा कार्यकर्त्यांचा उत्साह बुधवारी कोकण दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्या दरम्यान सावंतवाडी तालुक्यात पाहायला मिळाला. मळगांवमधील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मळगांव ते झाराप बायपास मार्गे रॅली काढून घोषणा देत मळगांव परिसर व आराध्या हॉटेल परिसर दणाणून सोडला.

कोकणात विशेष दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी माडखोल येथे सावली हाॅटेलमध्ये अल्प वेळ विश्राम केल्यानंतर सावंतवाडी येथील गवळी तिठा व मळगांव येथील मळगांव येथे स्वागतासाठी थांबलेल्या पदाधिकारी व युवा कार्यकर्ते यांच्या तर्फे करण्यात आलेल्या जंगी स्वागताची स्विकार केला. यावेळी राज ठाकरे यांच्या समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे, महिला प्रमुख शर्मिला ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, शिशीर सावंत, चित्रपट सेना अध्यक्ष अमित खोपकर, कामगार सेना अध्यक्ष संजय गोळे, संघटक व प्रवक्ते नितीन सरदेसाई, जीजी उपरकर, सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष धिरज परब आदी नेते या विशेष दौऱ्यात सहभागी झाले.       

   दरम्यान राज ठाकरे यांचे आंबोली सहित सावंतवाडी गवळी तिठा, मळगांव येथील झाराप पत्रादेवी महामार्ग, नेमळे, झाराप व कुडाळ येथे मोठमोठे कट आऊट, बॅनर,फलक लावण्यात आले होते. नेमळे, मळगांव येथे करण्यात आलेल्या स्वागतावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे माजी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सुधीर राऊळ, मनसेचे माजी काॅलेज अध्यक्ष साहिल तळकटकर, विभाग अध्यक्ष विजय बुगडे, मळगांव माजी शाखा अध्यक्ष राकेश परब, अमोल नाईक, ओमकार नवार,महेंद्र कांबळी, शतायु जांभळे, ओमकार तळवणेकर, हर्षद तळवणेकर,केतन सावंत, आदित्य राऊळ, प्रथमेश राणे, जय राऊळ, मकरंद राऊळ, आदेश राऊळ, अजित पोळजी, विशाल राऊळ, अक्षय माळकर आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.   

 या विशेष दौऱ्यावर आलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आपल्या युवा कार्यकर्त्या वरील अतूट प्रेम पहायला मिळाले. मळगांव येथून आराध्या हाॅटेलकडे त्यांचा ताफा वेगाने  निघाला असताना त्यांच्या पाठोपाठ दुचाकी वरुन मागे मागे येणारे आपल्या युवा कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मागे सोडून पुढे न जाता नेमळे येथे आपली गाडी थांबवून सर्वप्रथम त्यांना पुढे जाऊ दिले. तसेच त्यांनी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची आस्थेने विचारपूस केली.