परप्रांतीय बस चालकांविरोधात मनसे आक्रमक !

Edited by: विनायक गावस
Published on: November 28, 2023 11:26 AM
views 327  views

सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चालक असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने  झाराप झीरो पॉइंट येथे परप्रांतीय बस चालक विरोधी निदर्शने करण्यात आली. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक ड्रायव्हर यांच्यावर परप्रांतीय ड्रायव्हर यांच्याकडून होणारा अन्याय तसेच जिल्ह्यातील ये-जा करणारे पॅसेंजर यांना चुकीच्या भाषेतून दिली जाणारी उत्तरे व त्यांची मुजोरी या विरोधात निदर्शने करण्यात आली. 

परप्रांतीयांची  मुजोरी खपवून घेतली जाणार नाही. वेळप्रसंगी जशास तसे उत्तर देऊ व अशा  मुजोरांना या ठिकाणी थारा देणार नसल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. तसेच प्रत्येक लक्झरी मालकांना  स्थानिक् चालकांचे मागण्यांचे रीतसर निवेदन पाठवण्यात आले‌. यात भत्ता वाढ, हॉटेल एन्ट्री अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच आमच्या स्थानिक ड्राइव्हर तसेच लक्झरीतून ये-जा करणाऱ्या पॅसेंजर यांना यापुढे मुजोर उत्तरे मिळाल्यास परप्रांतीय ड्रायव्हर असलेली एकही लक्झरी जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही असा इशारा उपस्थित मनसे पदाधिकारी तसेच चालक असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने देण्यात आला. तर आरटीओने देखील याची योग्य ती दखल घ्यावी व चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या वाहतुकीवर व स्थानिक बस चालकांच्या लायसन्सवर होत असलेल्या कारवाई यावर आळा घालावा‌. अन्यथा रंगेहात पकडून देऊ त्यानंतर जे काही होईल त्यास आरटीओ जबाबदार असेल असा इशारा उपस्थितांकडून देण्यात आला.

यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनसे विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, चालक असोसिएशन अध्यक्ष विजय जांभळे, माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक, अण्णा खोटलेकेर, जिल्हा सचिव निलेश देसाई, तालुकाध्यक्ष संदेश सावंत, गिरगोल दिया स्वप्नील जाधव, नंदू परब, गीतेष मळगावकर, रुपेश गुळेकर, पंकज देसाई, सहबाझ रखांगी, चेतन सरमळकर, उदय गावडे, अभय मयेकर, इब्राहिम शेख, मनोज धुमाळे, अभी पेडणेकर, किरण सावंत, भक्तिश कवळे, प्रमोद गावडे, अमेय टेमकर, प्रसाद भगत, समीर शेख, जावेद शहा, सिद्धेश घारे, भाऊ गावडे आदी उपस्थित होते.