
सावंतवाडी : हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात मनसे आक्रमक पवित्रा घेतला आहे. नविन शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सुत्र अवलंबल असून यात तिसरी भाषा हिंदी व इतर आहे. मात्र, इ. पहिलीपासून हिंदी भाषा नको असा पावित्रा मनसेन घेत अनेक शाळांना निवेदने दिली. हिंदीची सक्ती केल्यास ते खपवून घेणार नाही असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी दिला आहे.
राज्य शासनाच्या नव्या अध्यादेशाने राज्यातील सर्व मराठी व इंग्रजी शाळांमधून तृतीय भाषा म्हणून हिंदी व इतर काही भाषांचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, यात हिंदीला प्राधान्य मिळणार अशी परिस्थिती आहे. राज्यात झालेल्या विरोधानंतर अनिवार्य करण्यात आलेली हिंदी पर्यायी करण्यात आली. यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. हिंदी सक्तीला त्यांनी विरोध केला. याबाबत आज मनसे तर्फे सावंतवाडी शहरातील शाळांना भेट देऊन राज ठाकरे यांनी दिलेल्या निवेदनाची प्रत देण्यात आली. मुलांना हिंदी भाषेची सक्ती न करण्याबाबतचा इशारा सर्व शाळा व्यवस्थापकांना देण्यात आला.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, उपाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, शहर अध्यक्ष राजू कासकर, उप तालुका अध्यक्ष अतुल केसरकर, सुनिल आसवेकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, उपाध्यक्ष साईल तळकटकर,आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.