पिंगुळीतही मनसेच्या गडाला 'सुरुंग' !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 01, 2024 13:50 PM
views 1619  views

कुडाळ : मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी काल तडकाफडकी प्राथमिक सदस्यत्वाच्या दिलेल्या राजीनाम्यानंतर त्याचे पडसाद आता कुडाळ तालुका संघटनेत उमटू लागले आहेत. पिंगुळीतील मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा दोन टर्म ग्रामपंचायत सदस्य राहिलेले बाबल गावडे, पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष तथा माजी कुडाळ उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे ,माजी विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, शाखाध्यक्ष वैभव धुरी यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनीही पक्षातील गटबाजी, चुकीच्या नेमणुका व बडव्यांचा उपद्रव याकडे बोट दाखवत कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र केल्याचे म्हटले आहे.