
दोडामार्ग:
दोडामार्ग तालुक्यात आयी गावात एम एन जी एल च्या रिकेट्सला आदळून एक परप्रांतीय दुचाकीस्वार गंभीर झाला आहे. मंगळवारी उशिरा हा अपघात झाला. MNGL च्या निष्काळीपणामुळे हा अपघात झाला असून हा असाच बेजबादारपणा सुरू राहिल्यास कुणाचा जीवही जाऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने याबाबत कडक धोरण हाती घेणे आवश्यक आहे.
हा अपघात घडल्यानंतर तेथील ग्रामस्थ, शिवसेनेचे बबलू पांगम विवेक पर्येंकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख यांना माहिती देताच बाबूराव धुरी त्याठिकाणी तात्काळ दखल झाले. अपघातात जखमी झालेल्या युवकाची प्रकृती गंभीर असल्याने व त्याच्या हाताला जबर मार लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे.