दोडामार्गात MNGL ठेकेदारांच धुमशान सुरूच

PWD च्या कार्यकारी अभियंत्याविरोधात ढोल बजाव आंदोलन
Edited by:
Published on: December 10, 2022 22:32 PM
views 189  views

दोडामार्ग : डोळ्यावर पट्टी बांधून सपशेल गांधारीच्या भूमिकेत गेलेल्या सावंतवाडीतील सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानी बांदा-दोडामार्ग-आयी रस्ता एमएनजीएल कंपनीच्या ठेकेदारांना पाहिजे तसा खोदण्यासाठी आंदण देऊन हा रस्ता जणू "समृद्धी महामार्ग"  केल्याची जोरदार टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केली आहे. वेळीच डोळे उघडा आणि बांद्यापासून ते दोडामार्ग आयी राज्यमार्गाची सुरू असलेली धूळधाण थांबवा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन छेडावे लागेल असा रोखठोक ईशारा बांधकाम च्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना दिला आहे. 

    चक्क दोडामार्ग शहरात धुमशान घालणाऱ्या धुमशान घालणाऱ्या या बेफाम ठेकेदारांना पाठीशी घालून बांधकामच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची नाही आपल्या समृद्धी साठी अधिकाऱ्यांनी जनतेच्या तोंडात धूळ घातली आहे असा जोरदार हल्ला चढविला आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी बांधकाम च्या कार्यकारी अभियंता चव्हाण यांना लक्ष केलंय. मोठ मोठ्या वल्गना करणाऱ्या सरकारने दोडामार्ग मधील रस्त्यांची परिस्थिती पहावी, दोडामार्ग बाजारपेठ नष्ट होण्याच्या मार्गावर एमएनजीएलच्या ठेकेदारांनी आणली आहे. बांधकाम खात्याच्या  मालकीच्या रस्ता खोदला जात असताना कार्यकारी अभियंता श्रीमती अनामिका चव्हाण या सपशेल गांधारीचे रूप घेऊन डोळवर पट्टी बांधुन आपल्या ऑफिसमध्य बसल्या आहेत. जर जरा जरी जनाची नाही तर मनाची लाज असेल तर दोडामार्ग बाजारपेठची गॅसपाईप लाईनमुळे झालेली दुर्दशा पाहावी. दुरुस्ती नकोच नीदान आपल्या मुक संमतीमुळे आपण काय पाप केले ते तरी पहावे.

साईडपट्टी दुरुस्तीच्या नावाखाली खर्च होणारे पैसे ठेकेदार रस्ता दुरुस्त करण्याची वाट बांधकाम विभाग पाहत आहे. आता मर्जीतल्या माणसाला साईडपट्टीचे वाटप दाखवुन लोकांचा होणारा आक्रोश ठेकेदारावर मारून रस्ता घाई गडबडिने केला जाणार आहे. मग साईडपट्टी बसल्यानंतर जनता फक्त बोंब मारणार, हे त्यांना माहित आहे.

तात्काळ बांद्यापासुन आयी पर्यंत रस्ता साईडपट्टी अगोदर दुरुस्त करा. नाहितर आपल्या कार्यालयासमोर ढोल वाजवून आंदोलन करावे लागणार आहे. आचारसंहिता संपताच ' कुंभकर्णा प्रमाणे झोपलेल्या अधिकाऱ्याने जागे करण्यासाठी ढोल वाजवून आंदोलन करावे लागणार आहे. याची नोंद घ्यावी असा कडक ईशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे.