
रत्नागिरी : सत्ताधारी शिंदे गटातील अनेक नाराज आमदार आपल्या संपर्कात असून आठ ते दहा आमदारानी या संदर्भात संपर्क केला आहे. ज्या दिवशी अजितदादा आणी कंपनीने भाजपमध्ये तिकडे उडी मारली त्याच दिवशी शिंदेगटातील या नाराज आमदारांमध्ये चलबीचल सुरू झाली आहे.
आमदारांचा होत असलेला उद्रेक थांबवताना एकनाथ शिंदेची त्रेधातिरपीट उडत आहे. आम्हाला पुन्हा मातोश्रीने साद घातली तर आम्ही येवू अस एका मंत्र्याने काही दिवसापूर्वीच विधान केल होत. ते तुम्ही एकेलच असेल. शिंदे गटातील काही आमदार आपल्या संपर्कात असून ते शिवसेनेत यायला तयार आहेत. असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.
पण या आमदारांना घेणार का..? या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले त्यांना घेवू नये असे बहुतांश शिवसैनिकांचे मत आहे. अशावेळी या आमदारांना पक्षात घ्यायचे की नाही हे सर्व उद्धव ठाकरेंना अधिकार दिले आहेत. असे विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत दावा केला आहे. विनायक राऊतांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.