उपसरपंचांनी वेधलं आमदारांच लक्ष

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 22, 2023 16:38 PM
views 176  views

कुडाळ : मांगलेवाडी अंगणवाडी दुरुस्तीस अनुदान मंजूर करा अशी मागणी बिबवणे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन बिबवणे ग्रामपंचायत उपसरपंच दीपक सावंत यांनी आमदार वैभव नाईक यांना दिले. 

निवेदनात असे म्हटले आहे की, कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथील मांगलेवाडी अंगणवाडीचे छप्पर पूर्णपणे नादुरुस्त झालेले आहे. जून 2023 पासून मुले अंगणवाडीत बसवली जात नाहीत. पर्यायी मुलांना बसण्याची सोय म्हणून अंगणवाडी मदतनीस यांच्या घरी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तरी मांगलेवाडी अंगणवाडी छप्पर दुरुस्ती करण्यास पाच लाख रुपये अनुदान आपल्याकडून मंजूर व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे उपसरपंच दीपक सावंत यांनी केली आहे.