आमदार ऑन फिल्ड

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 07, 2024 13:58 PM
views 503  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कसाल, ओरोस येथे पुरस्थिती निर्माण झाली. ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी शिरले. पुरस्थितीत आमदार वैभव नाईक पुरस्थितीची पाहणी करत मदतीला उतरले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस सुरू असून ओरोस, कसाल येथे पूरस्थिती उद्भवली आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. याची माहिती मिळताच आमदार वैभव नाईक यांनी तातडीने याठिकाणी भेट देत पाहणी केली. घरात पाणी गेलेल्या नागरिकांची तात्पुरती राहण्याची व जेवणाची व्यवस्था करत त्यांना धीर दिला. त्यांना आवश्यक वस्तू पुरविण्याचे नियोजन केले. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर ओसरगाव येथे पुराच्या पाण्यात एका नागरिकाची चारचाकी गाडी अडकली होती. ही गाडी चालू करण्यासाठी आ. वैभव नाईक यांनी प्रयत्न केले. मात्र गाडी बंद पडल्याने आ. वैभव नाईक यांनी स्वतः गाडी ढकलून ती पाण्याबाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले.