
कणकवली : भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा धूमधडाका लावलेला असताना.देवगड विभागातील आरे गावातील सतीश कदम, ममता कदम, शामसुंदर कदम, रामकृष्ण कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. यांचा प्रवेश राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे ओम गणेश निवासस्थानी पक्षात स्वागत केले. यावेळी नितीन कदम पांडुरंग कदम संतोष कदम भाऊ कदम संदीप साटम अमित साटम संतोष फाटक व भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी,आदी उपस्थित होते.