
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कथित अनधिकृत धंदे आणि त्यांना पोलीस प्रशासनाचा मिळत असलेला पाठिंबा या मुद्द्यावरून आज सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गंभीर आरोप करत, जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत धंद्यांचा मुद्दा जनतेसमोर मांडणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी ते आज पत्रकार परिषद घेणार आहेत.
“सिंधुदुर्गातले सगळे अनधिकृत धंदे आणि त्या धंद्यांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. दहीकर देत असलेला पाठिंबा मला जनतेसमोर ठेवावा लागणार,” असे वक्तव्य निलेश राणे यांनी केले असून, यामुळे जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही वेळातच आमदार निलेश राणे यांची पत्रकार परिषद सुरु होणार आहे. या पत्रकार परिषदेकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे।










