
कणकवली : कणकवली येथील ऑटो रिक्षा चालक-मालक सार्वजनिक गणेशोत्सव कला क्रीडा मंडळ, कणकवली यांच्यावतीने नवसाला पावणारा ‘कणकवलीचा राजा’ या गणपती गजाननाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या कणकवलीच्या राजाचे कुडाळ - मालवणचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी दर्शन घेतले.
यावेळी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष बाळा वराडकर यांनी आमदार राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कणकवलीचा राजाच्या चरणी सिंधुदुर्गवासियांना सुख , समृद्धी दे .. निरोगी आणि उदंड आयुष्य मिळू दे...प्रत्येकाच्या जीवनात आनंद मिळूदेत, असे साकडे राणे यांनी घातले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री , भाजप शहराध्क्ष अण्णा कोदे , साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम , समीर प्रभुगांवकर यांच्यासह रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.










