
कुडाळ : महाराष्ट्रात जेव्हा कधी 'आदर्श जिल्हाप्रमुख' आणि 'आदर्श उपनेता' हे पुरस्कार जाहीर होतील, तेव्हा या दोन्ही पदांसाठी शिवसेना नेत्यांची नावे अग्रक्रमाने नोंदवावी लागतील, असे मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना (शिंदे गट) उपनेते संजय आंग्रे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कामावर आपण पूर्णपणे समाधानी असून, त्यांनी केलेल्या जोरदार कामगिरीची ही पोचपावती असल्याचे हे गौरोद्गार होते.
आमदार निलेश राणे यांनी या दोन्ही नेत्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली.
संजय आंग्रे (शिवसेना उपनेते) कणकवली-वैभववाडी परिसरात संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्काचे काम अत्यंत प्रभावीपणे करत आहेत.
त्यांच्या उपनेतेपदाच्या कार्यामुळे या भागात शिवसेनेला (शिंदे गट) मोठे बळ मिळत आहे, याची दखल आमदार राणे यांनी घेतली. दत्ता सामंत हे कुडाळ-मालवण तालुक्यात जिल्हाप्रमुख म्हणून जोरदार काम करत आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखालील कामामुळे या भागात संघटना अधिक मजबूत होत असून, विकासकामांना गती मिळत असल्याचे राणे यांनी नमूद केले.










