राजन परब यांच्या कुटुंबियांना आ. निलेश राणेंनी दिला धीर

Edited by:
Published on: July 05, 2025 13:36 PM
views 424  views

सिंधुदुर्ग : कसाल गावाचे सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य राजन परब यांचे सुपुत्र कुमार आनंद राजन परब यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. आज कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी परब कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला व शोक व्यक्त केला.

ही बातमी अत्यंत वेदनादायक असून परब कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि परब कुटुंबीयांना या अपार दुःखातून सावरण्याची ताकद देवो, अशी प्रार्थनाही केली.

यावेळी उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख दीपक नारकर, दीपक पाटकर आदी उपस्थित होते.