आम. केसरकरांचं 21 दिवसांच्या गणरायांचं दर्शन

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 16, 2025 16:04 PM
views 59  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी, वेंगुर्ला येथील २१ दिवसांच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देत दर्शन घेतले. मतदारसंघातील गणपतींचे श्री. केसरकर यांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, हरिविजय सोनसूरकर, शिवसेना तालुका संघटिका पूजा हरिविजय सोनसूरकर आदी उपस्थित होते.