कालिदास कोळंबकरांचा होणार मालवणात भव्य सत्कार

सकल भंडारी हितवर्धक संस्थेचा पुढाकार
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 05, 2025 17:24 PM
views 218  views

मालवण : मुंबईतील वडाळा- नायगाव मतदार संघातून नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांचा भंडारी समाजाच्या वतीने १८ फेब्रुवारी रोजी मालवण येथे भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भंडारी समाजाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सकल भंडारी हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर यांनी दिली. 


भंडारी समाजाची बैठक भरड येथील लीलांजली हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर, सकल भंडारी हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, उपाध्यक्ष सुनील नाईक, सचिव पंकज पेडणेकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी नगरसेवक यतीन खोत, राजू आंबेरकर, भाऊ साळगावकर, देवदत्त हडकर, अजित गवंडे, सचिन गवंडे, बाळा सोन्सुरकर, प्रवीण मांजरेकर, चंद्रशेखर वाईरकर, सागर हडकर, सचिन आरोलकर यांच्यासह अन्य भंडारी ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.