
सिंधुदुर्ग : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एसपीच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड व पक्ष निरीक्षक बशीर मुर्तजा हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर शनिवार दिनांक ३ मे २०२५ रोजी दुपारी २ वाजता कुडाळ येथील हॉटेल लेमन ग्रास येथे येणार आहेत.
यावेळी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसची (शरदचंद्र पवार) जिल्हा कार्यकारिणी व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, प्रांतीक सदस्य प्रसाद रेगे, व्हिक्टर डान्टस, कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब, नंदूशेठ घाटे, सुरेश दळवी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक ३ मे रोजी दुपारी २ वाजता बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी केलं आहे.