MITM सुकळवाड अभियांत्रिकी कॉलेजमध्ये पदवी प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 27, 2023 15:36 PM
views 76  views

मालवण : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता होणाऱ्या (सी ई टी सेल) अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष प्रवेशप्रकियेच्या नोंदणीसाठी शनिवारपासून सुरुवात केली आहे.या प्रवेशाचे वेळापत्रक राज्य 'सी ई टी सेल' ने शनिवारी प्रसिद्ध केले. त्यानुसार अभियांत्रिकी प्रवेशासाठी नोंदणी अर्ज भरण्यासाठी 3 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे व अर्ज निश्चित करणेकरिता E Scrutiny व Physical Scrutiny असे दोन पर्याय आहेत.याची मुदत 4 जुलै पर्यंत करण्यात आली आहे.

जयवंती बाबू फाऊंडेशन संचालित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता महाविद्यालयामध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.सुट्टीच्या दिवशी रविवारी देखील प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश नोंदणी प्रक्रिया सूरु आहे.

या सुविधाकेंद्रावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, सर्व विद्याशाखाची माहिती,त्यांचे मागील वर्षाचे कट-ऑफ,प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रांची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व शिष्यवृत्याची माहिती तसेच पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शाखानिहाय भविष्यातील संधी इत्यादी  बाबत सविस्तर समुपदेशन केले जाते.मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट हे(एस.सी.क्रमांक-3440) हे नोंदणी प्रवेशासाठी शासनाचे मान्यता प्राप्त केंद्र आहे.  

मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या कॉलेजमध्ये पदवी व पदविका उत्तीर्ण होणारे विद्यार्थी दरवर्षी विविध नामांकित कंपन्यांमध्ये चागल्या पदावर कार्यरत आहेत.येथील वैविध्यपूर्ण शिकवण्याची पद्धत,अद्यावत लँबोटरीज,सूसज्ज ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम,स्वच्छ व नैसर्गिक वातावरण उपलब्ध आहे.तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी https://fe2023.mahacet.org या लिंकवर,तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी https://cetcell.mahacet.org/ या लिंकवर संपर्क साधण्याचे आवाहन मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मनेजमेंट कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी केले आहे.