क्रीडा विभागाचा गलथान कारभार ; पालकांचा चढला पारा

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 16, 2025 19:58 PM
views 19  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत क्रीडा विभागाचा गलस्थान कारभार दिसून आला. ज्या ठिकाणी स्पर्धा होती त्याठिकाणी स्पर्धेचा फलक नसणे, अपुरी पाणी व्यवस्था, पंखे नसणे, अस्वच्छ स्वच्छतागृह आदींमुळे येथे स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. हॉल मध्ये पंख्याची सुविधा नसल्याने गर्मीमुळे हैराण झालेले विद्यार्थी भोवळ येऊन पडू लागल्याने पालकांचा पारा चढला. त्यांना क्रीडा विभागाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली. 

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे सध्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा सुरू आहेत. आज येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्हाभरातून एकूण २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांसह क्रीडा शिक्षक, पालक उपस्थित होते. सकाळच्या सत्रात स्पर्धा संपन्न झाल्यावर दुपारच्या सत्रात कडक उन्हामुळे हॉल मध्ये गर्मी वाढू लागली. मात्र हॉल हा बंदिस्थ असल्याने हवा खेळती राहण्यास मार्ग नाही परिणामणी हॉल मधील वातावरण आणि गर्मी.वाढू लागली. तसेच हॉल मध्ये एकही पंखा नसल्याने वातावरणातील गर्मीमुळे काही विद्यार्थी चक्कर येऊन पडू लागल्याने पालकांनी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत स्पर्धेच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केला. तसेच गर्मीच्या कालावधीत स्पर्धा होते मात्र हॉल मध्ये पंखे नाहीत, पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी पडली, स्वच्छतागृह देखील अस्वच्छ असल्याकडे लक्ष वेधले.

क्रीडा स्पर्धा सुरू करताना स्पर्धेसाठी टेबल आणि खुर्ची व्यवस्था करण्यासाठी क्रीडा विभागाकडे मनुष्यबळ उपस्थित नव्हता, क्रीडा शिक्षक आणि पालकांच्या सहकार्याने ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे पालक स्वप्नील सावंत यांनी यावळी सांगितले.

नाराजी वाढल्यानंतर चारच पंखे आणले

पालकांच्या तीव्र नाराजीचा परिणाम म्हणून अखेर दुपारी तीन वाजता क्रीडा विभागाने पंख्याची व्यवस्था केली. मात्र २५० विद्यार्थी असताना केवळ चार पंखे आणण्यात आले. एवढ्या मोठ्या हॉलमध्ये चारच पंखे कसे पुरतील, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला.

स्पर्धेचा फलक नाही

     क्रीडा संकुल येथे आज सूर असलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा फलक कोठेही लावण्यात आलेला नव्हता. एवढी मोठी स्पर्धा असून त्याचा फलक नाही याबाबतही पालकांनी नाराजी व्यक्त केली.