किंजवडे जि. प. विभागात रेनकोटचे वाटप

मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसाचंनिमित्त
Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 22, 2025 15:44 PM
views 130  views

देवगड : सिंधुदुर्गचे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त किंजवडे जिल्हा परिषद विभागात रेनकोटचे वाटप भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम आणि विभागीय अध्यक्ष ओमकार खाजनवाडकर यांच्या सहकार्याने तसेच हिंजवडी जिल्हा परिषद गट यांच्यावतीने वायरमन यांना मोफत करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे, विभागीय अध्यक्ष ओंकार खाजनवाडकर, दशरथ लोके, रवींद्र ठुकरूल, गुरु घाडी, संतोष करंगुटकर, योगेश परब, रोहित कोठारकर, रावजी खाजनवाडकर, सचिन नाचणकर मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि वायरमन कर्मचारी उपस्थित होते.

तसेच विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये 1600 वह्या पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. नामदार नितेश राणे यांचा 23 जून रोजी वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने संपूर्ण विधानसभेत विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा होत आहे.